Execute

उपलब्ध समाज माध्यमे व त्यातील पत्रकार मित्र, स्नेही हे गच्चीवरची बाग इच्छुकांपर्यत पोहचण्यासाठी मोलाची मदत करत आहेत. हे काम प्रत्यक्ष रित्या समाजामधे रूजवण्यासाठी Grow, Guide, Build, Products Sale & Services व्दारे प्रयत्न करत आहोत. यासाठी आमचे कुटुंबाती सदस्य , मित्र व मदतनीसांच्या प्रत्यक्ष सहकार्यानेच हे काम प्रत्यक्ष रूपात उभे राहत आहे. पॅशन टू प्रोफेशन असे उद्योजकतेचे व्रत हाती घेतले आहे. Zero To Hero असा प्रवास आता आणखी पुढील टप्प्यावर नेत आहे. अर्थात हे आपल्या सहकार्यामुळेच शक्य झाले या बद्दल बाग प्रेमीचे, निसर्ग प्रेमीचे ऋृणी आहोत.

हे काम लोकांपर्यत पोहचण्यासाठी आम्ही एक डेमो प्रोजेक्ट घरच्या छतावर तयार केला आहे. जेथे आम्ही राहतो. व त्यातून येणार्या विषमुक्त भाज्या सेवन करतो. व हा प्रयोग , अनुभव, सेवा लोकांपर्यंत पोहचण्यासाठी गच्चीवरची बाग एक्सटेन्शन ( जेथे आमचे रोजचे कामकाज चालते) तयार केले आहे. त्याठिकाणी गाय, गोठा व बागेसाठी लागणार्या आवश्यक खतांची साठवणूक केली आहे.